गोव्यात अवैध वाळू व्यवसायात वाळू माफियांचा वर्चस्ववाद शिगेला !

राज्यात गेल्या १५ वर्षांत नवीन बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वाळूची मागणी वाढली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन होऊ लागले आहे.

छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये अवैधरित्या होत असलेल्या गोमांस विक्रीच्या विरोधात आंदोलनाची चेतावणी !

गोप्रेमी आणि गोरक्षक यांना यासाठी आंदोलन करावे लागणे, हे संतापजनक आहे. यावरूनच इतर धर्मीय हे किती कट्टर असतात, हे लक्षात येते. प्रशासन यामध्ये लक्ष का घालत नाही ?

मांडरे (जिल्हा कोल्हापूर) येथे गणेशोत्सवाच्या महाप्रसादाच्या वेळी गोळीबार; १२ जणांवर गुन्हा नोंद !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंडळाने २ सप्टेंबरला महाप्रसादाचे आयोजन केले होते. या वेळी तेथील प्रथेप्रमाणे महाप्रसाद वाटपाच्या वेळी अगरबत्ती लावून, पंक्तीत हातावरून पाणी सोडून प्रसादाचा प्रारंभ झाला. या वेळी पाणी सोडण्याच्या मानपानातून मंडळातील दोन गटांत हाणामारी झाली.

भाविकांनी धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात, तसेच नैसर्गिक स्रोतात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे !

येथील नगरपालिका प्रशासनाने गणेशभक्त आणि गणेशोत्सव मंडळे यांनी कृत्रिम तलावात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असा आदेश काढला आहे. त्या संदर्भात हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी नगराध्यक्ष श्री. जयंवत भाटले आणि नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेजी यांना भेटून निवेदन दिले.

संभाजीनगर येथील ९० टक्के शिक्षक गावात न रहाता खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात ! – आमदार प्रशांत बंब यांचा आरोप   

राज्यातील जवळपास ७० टक्के शिक्षक गावात रहात नाहीत. ते खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात, असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी २ सप्टेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

पिंपरी येथील खासगी वाहनांनी तिकीटांचे दर अधिक घेतल्यास कारवाई करू ! – उपप्रादेशिक परिवहन विभागाची चेतावणी

गणेशोत्सव आणि इतर सण-उत्सवांच्या काळात शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी गर्दी करतात. त्या वेळी खासगी वाहनचालक, खासगी ट्रॅव्हल्स आस्थापने नागरिकांच्या परिस्थितीचा अपलाभ घेत अधिक दराने (दुप्पट दराने) तिकीट विक्री करतात.

पंढरपूर शहरासाठी नव्याने १ सहस्र कोटी रुपयांचा प्रारूप विकास आराखडा सिद्ध !

श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी प्रतिवर्षी लाखो भाविक येतात. त्यासाठी शहराचा नवीन विकास आराखडा सिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये शेगाव दुमाला ते गोपाळपूर असा नवीन सिमेंटचा पूल, शहरात नवीन २० रस्ते, पालखी तळासाठी स्वतंत्र जागा, नदी घाटाचे सुशोभिकरण यांसह अन्य कामांचा समावेश असणार आहे.

गांधी घराण्यावरील निष्ठा संपुष्टात (?)

काँग्रेसमधील तत्कालीन नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाची पुण्याई काँग्रेसच्या पुढील नेतृत्वाला टिकवून ठेवता आली नाही. त्यामुळे ‘भाजप काँग्रेसला संपवेल’, असे म्हणण्यापेक्षा ‘काँग्रेसला संपवण्यासाठी राहुल गांधी हेच पुरेसे आहेत’, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल !

पुणे येथे विज्ञापन फलकाद्वारे श्री गणेशाचे विडंबन !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या अशा आस्थापनाच्या उत्पादनांवर भाविकांनी बहिष्कार घालायला हवा, तसेच अशाप्रकारे विडंबन रोखण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

नगरमध्ये ७ वर्षांच्या बालिकेवर धर्मांधाकडून अत्याचार !

येथील काटवन खंडोबा रस्त्यावर असलेल्या एका मंगल कार्यालयात ‘वॉचमन’ म्हणून काम करणार्‍या युसुफ कुरेशी या ३४ वर्षीय आरोपीने परिसरातील घरासमोर खेळणार्‍या एका ७ वर्षीय बालिकेवर ३१ ऑगस्ट या दिवशी अत्याचार केला.