नगरमध्ये ७ वर्षांच्या बालिकेवर धर्मांधाकडून अत्याचार !

प्रतिकात्मक छायाचित्र

नगर – येथील काटवन खंडोबा रस्त्यावर असलेल्या एका मंगल कार्यालयात ‘वॉचमन’ म्हणून काम करणार्‍या युसुफ कुरेशी या ३४ वर्षीय आरोपीने परिसरातील घरासमोर खेळणार्‍या एका ७ वर्षीय बालिकेवर ३१ ऑगस्ट या दिवशी अत्याचार केला. या घटनेनंतर नगर शहर सोडून पसार होण्याच्या सिद्धतेत असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. (पुन्हा कुणी असे कृत्य करण्यास न धजावण्यासाठी अशा नराधमांना शरियतनुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! – संपादक) पीडित बालिका मजूर कुटुंबातील असून अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिला हा प्रसंग कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. (अत्याचार करून वर ठार मारण्याची धमकी देणारे उद्दाम धर्मांध ! – संपादक) बालिकेचे आई-वडील घरी आल्यावर त्यांना हा प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.