छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये अवैधरित्या होत असलेल्या गोमांस विक्रीच्या विरोधात आंदोलनाची चेतावणी !

गोप्रेमी आणि गोरक्षक यांना यासाठी आंदोलन करावे लागणे, हे संतापजनक आहे. यावरूनच इतर धर्मीय हे किती कट्टर असतात, हे लक्षात येते. प्रशासन यामध्ये लक्ष का घालत नाही ?

पुणे – येथील कॅन्टोन्मेंट भागामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये दुकानदारांना बीफ (डुकराचे मांस) विकण्यास अनुमती आहे; मात्र येथील ९० टक्के विक्री गाय आणि बैल यांच्या मांसाची होते. हे लक्षात येऊ नये; म्हणून दुकानदार म्हशीचे मांस आणून ते विक्रीसाठी समोर ठेवून नागरिक आणि पोलीस यांची दिशाभूल करत आहेत. या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पुणे जिल्ह्यातील गोरक्षक आणि गोप्रेमी यांनी मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांच्या नेतृत्वाखाली पुणे कॅन्टोन्मेंट विभागाचे मुख्य आयुक्त सुब्रतो पॉल आणि लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदम यांना निवेदन देऊन केली.

या वेळी पॉल यांनी कायदेशीर कारवाई करून मार्केटमध्ये गाय आणि बैल यांचे मांस विकले जाणार नाही याची निश्चिती दिली, तसेच ज्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत त्यांच्या दुकानाचे अनुमती पत्र (परवाने) रद्द करण्याचे आश्वासनही दिले आहे.

८ दिवसांत कारवाई न झाल्यास गोप्रेमी, शिवभक्त आणि गोरक्षक छत्रपती शिवाजी मार्केटवर धडक मोर्चा काढतील, याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असे मानद पशूकल्याण अधिकारी  शिवशंकर स्वामी यांनी सांगितले. या वेळी अधिवक्ता प्रशांत यादव यांच्यासह गोप्रेमी आणि गोरक्षक उपस्थित होते.