अकोला येथील ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात श्रीफळ अर्पण करून धर्मप्रेमींनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ

हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला येत्या घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर या दिवशी २० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने समिती आगामी दोन मास ‘हिंदु राष्ट्र संकल्प मास’ साजरे करणार आहे.

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता मूर्तीचे दान करावे ! – तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे धर्मद्रोही आवाहन

घरी मूर्तीच्या विसर्जनासाठी नगर परिषदेकडून अमोनियम बाय कार्बोनेटचे विनामूल्य वाटप

३ फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती सोलापूर शहरात विसर्जन करता येणार नाहीत ! – पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका

शहरातील श्री सिद्धेश्वर तलाव आणि छत्रपती संभाजी तलाव या ठिकाणी कृत्रिम तलाव करून श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याची सोय करण्यात आली आहे; मात्र या ठिकाणी ३ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही.

(म्हणे) ‘पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास अनुमती नाही !’ – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

कारखान्यांचे सांडपाणी, तसेच अन्य ज्या ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होते त्या सर्वांवर आम्ही कारवाई करत आहोत. नुकतीच प्रदूषण मंडळाने महापालिका प्रशासनास कारवाईची नोटीस दिली आहे, असे या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

पंचगंगा नदीमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यापासून नागरिकांना रोखू नये ! – कौशिक मराठे यांची जिल्हाधिकार्‍यांना कायदेशीर नोटीस

न्यायालयाचा नेमका आदेश काय हे जाणून न घेताच जिल्हाधिकार्‍यांनी स्वतःची मते नागरिकांवर लादून त्यांच्या धार्मिक भावनांचे हनन करणे, हा बहुसंख्य हिंदूंवर अन्यायच आहे !

मिरामार आणि बोगमाळो येथे विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती तरंगत समुद्रकिनार्‍यावर !

गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीं पूजण्यात आल्याचे उघड

प्रदूषणास हातभार लावणार्‍या कोल्हापूर महापालिकेला ‘श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते’ असे सांगण्याचा अधिकार नाही ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

पंचगंगा प्रदूषण प्रकरणी महापालिकेला २ कोटी २० लाख रुपये दंडाची नोटीस

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने मंचावर लावलेले वीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांचे फलक हटवले

ईदगाह मैदानात पत्रकारांशी बोलतांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, वीर सावरकर हे महान देशभक्त आहेत, असे आयोजकांचे मत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे छायाचित्र लावले आहे. त्यात चुकीचे काय आहे ?

गोरखपूर नगरपालिकेतील बहुतेक वॉर्डांची इस्लामी नावे पालटली !

असा निर्णय देशातील प्रत्येक पंचायत, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, राज्य सरकार आदींनी घेतला पाहिजे !

आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार ! – सचिन कल्याणशेट्टी, आमदार, भाजप

अक्कलकोट मतदारसंघातील भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याविषयी ‘सोलापूर श्रमिक पत्रकार संघटने’च्या वतीने वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.