गणेशोत्सव मंडळाला ‘अफझलखान वधा’चा देखावा दाखवायला पुणे पोलिसांनी अनुमती नाकारली !
सत्य इतिहास दाखवल्यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होण्याचे कारण सांगून पोलीस देखाव्याला विरोध करत असतील, तर हा इतिहासाचा गळा घोटण्याचा प्रकार नव्हे का ?
सत्य इतिहास दाखवल्यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होण्याचे कारण सांगून पोलीस देखाव्याला विरोध करत असतील, तर हा इतिहासाचा गळा घोटण्याचा प्रकार नव्हे का ?
देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेमध्ये होत असल्याचा साटम यांचा आरोप
वारंवार अशा प्रकारच्या धमक्या येऊ नयेत, यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा धाकच निर्माण करणे आवश्यक !
२३ ऑगस्ट या दिवशी विधानपरिषदेचे कामकाज सकाळी १० वाजता चालू होणार होते; मात्र अत्यल्प सदस्य उपस्थित असल्याने उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्हे यांनी १० मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले.
कॉ. पानसरे हत्या प्रकरणात वर्ष २०१५ मध्ये जेव्हा पहिल्यांदा समीर गायकवाड यांचे जामीन आवेदन फेटाळण्यात आले. तेव्हापासून आम्ही दोष निश्चितीची मागणी करत होतो; मात्र सरकार पक्षाच्या वतीने वारंवार वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात आहे.
स्वामी विवेकानंद यांनी ‘एक हिंदु धर्मांतरित होतो, तेव्हा एक हिंदु न्यून होतो, असे नाही, तर देशाचा एक शत्रू वाढतो’, असे म्हटले आहे. प्रतिवर्षी भारतातील १० लाख हिंदूंचे धर्मांतर होत आहे.
महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, तसेच गड-दुर्ग यांचे संवर्धन करावे या मागण्यांसाठी समितीच्या शिष्टमंडळाने २२ ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या विषयांची निवेदने दिली.
गडावरील भूमी विकण्याची विज्ञापने प्रसिद्ध होत आहेत. सध्या गडावर ८०० हून अधिक खोल्यांची निर्मिती कशी झाली ? त्यामुळे या सर्वांचे अन्वेषण झाले पाहिजे.
अफझलखानाचे उदात्तीकरण रोखून आतंकवाद निर्मूलनाचे उदाहरण देणारे ठिकाण सर्वांसाठी खुले करावे !
मुलांना गुन्ह्यांपासून परावृत्त आणि व्यसनमुक्त करण्यासाठी नीतीमत्तेचे संस्कार साधनेने दृढ होतात. ‘धर्मनिष्ठ प्रजा’ हेच आदर्श राष्ट्राच्या निर्मितीचे मूळ मानले गेले आहे. त्यामुळे गुन्हे आणि मुले यांसारख्या संवेदनशील विषयांसाठी धर्मशिक्षण हाच अंतिम उपाय आहे !