ठाणे येथील ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी
ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांचाही समावेश आहे.
ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांचाही समावेश आहे.
शंभरकर यांनी सांगितले की, ‘मुंबई उच्च न्यायालयाने अधिकृत पशूवधगृहांव्यतिरिक्त पशूंची हत्या करू नये’, असे निर्देश दिले आहेत. अवैध पशूवधगृहांना अभय दिल्यामुळेच असे आवाहन करावे लागते !
महाविकास आघाडी सरकारने ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’चे ‘धाराशिव’ नामांतर केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांमध्ये प्रचंड अप्रसन्नता आहे. काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह अल्पसंख्यांक आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यागपत्रे दिली आहेत.
काँग्रेसने जन्माला घातलेली तथाकथित धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव यांचा त्याग करून हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यास हिंदुत्वनिष्ठ पक्षांना हिणवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची तोंडे आपोआप बंद होतील !
पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी राज्यातून ४ लाख १७ सहस्र ८९४, तर आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी ३ लाख ३ सहस्र ६९७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा परिषदेने सर्व सिद्धता पूर्ण केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथून पंढरपूर येथे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत मिरजजवळ बोलेरो गाडी घुसल्यामुळे १७ वारकरी घायाळ झाले आहेत. या घायाळ वारकऱ्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात भरती केले आहे.
लांडगे आणि त्यांच्या पत्नीने बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केल्यानंतर त्यांना तथ्य आढळून आले.
उमेश कोल्हे हत्या प्रकरण, अन्वेषणासाठी ७ संशयितांना मुंबई येथे हलवले ! ‘एन्.आय.ए’.च्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने ७ आरोपींच्या घरांची झडती घेतली.
मंत्रालयातील ६ व्या मजल्यावर येऊन एकनाथ शिंदे यांनी ७ जुलै या दिवशी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हात धरून त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवले.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने ७ जुलैपासून सायंकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत अभिषेक पूजा चालू केली, अशी माहिती माजी नगराध्यक्ष आणि श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त सचिन रोचकरी यांनी दिली आहे.