ठाणे येथील ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी

ठाणे, ७ जुलै (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांचाही समावेश आहे. ७ जुलै या दिवशी या सर्व नगरसेवकांनी शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. आता ठाणे महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय राजन विचारे यांच्या पत्नी सौ. नंदिनी विचारे या एकमेव नगरसेविका उद्धव ठाकरे यांच्या समवेत राहिल्या आहेत. आता नवी मुंबई येथील शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे समजते.