अमरावती येथे ‘एन्.आय.ए.’च्या १३ ठिकाणी धाडी

  • उमेश कोल्हे हत्या प्रकरण

  • अन्वेषणासाठी ७ संशयितांना मुंबई येथे हलवले !

उमेश कोल्हे

अमरावती – उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम याला साहाय्य करणार्‍याला राष्ट्रीय अन्वेषण संस्थेने (एन्.आय.ए.ने) ६ जुलै या दिवशी कह्यात घेऊन नागपुरी गेट पोलीस ठाण्यात त्याची चौकशी केली. नंतर त्याला सोडून देण्यात आले. ‘एन्.आय.ए.’च्या पथकाने जिल्ह्यात १३ ठिकाणी धाडी टाकल्या असून भ्रमणभाष संच, सीमकार्ड आणि मेमरी कार्ड, डी.व्ही.आर्.
कह्यात घेतले.

या प्रकरणातील ७ आरोपींना कह्यात घेण्यासमवेत त्यांचा ‘ट्रांझिट रिमांड’ ‘एन्.आय.ए.’ला स्थानिक न्यायालयाने मान्य केला आहे. ७ आरोपींना ६ जुलै या दिवशी सकाळी शहर पोलिसांच्या सुरक्षेत मुंबई येथे हलवण्यात आले आहे. ‘एन्.आय.ए’.च्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने ७ आरोपींच्या घरांची झडती घेतली.