घायाळ वारकऱ्यांना लागेल ते साहाय्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधतांना वारकरी

मिरज, ७ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथून पंढरपूर येथे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत मिरजजवळ बोलेरो गाडी घुसल्यामुळे १७ वारकरी घायाळ झाले आहेत. या घायाळ वारकऱ्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात भरती केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या वारकऱ्यांची ‘व्हिडिओ कॉल’द्वारे चौकशी केली.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी घायाळ वारकऱ्यांना प्रत्येकी २५ सहस्र रुपये, तसेच त्यांना लागेल ते साहाय्य करण्याचे आदेश आरोग्य अधिकाऱ्यांना दूरभाषद्वारे दिले. ‘आवश्यकता लागल्यास त्यांना खासगी रुग्णालयात भरती करावे. त्यांचा सर्व व्यय मी करीन’, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.