बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या प्रकरणी पुणे महापालिकेचे उपायुक्त लांडगे यांच्यासह पत्नीवर गुन्हा नोंद !

पुणे – १ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या प्रकरणी पुणे महापालिकेचे उपायुक्त विजय लांडगे यांच्यासह त्यांच्या पत्नीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये नुकताच गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांनी तक्रार दिली होती.

लांडगे आणि त्यांच्या पत्नीने बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केल्यानंतर त्यांना तथ्य आढळून आले. त्यानंतर विभागाने लांडगे यांच्या घरी धाड टाकली. त्यामध्ये लांडगे आणि त्यांच्या पत्नी यांच्या नावावर १ कोटी २ लाख ६० सहस्र रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली.