ठाणे ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयाचे काम १५ दिवसांत चालू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ९०० खाटांचे ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय उभारण्यास राज्यशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील रुग्णांना विनामूल्य दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत…

रस्ते, खड्डे आणि सामान्यांचे हाल !

रस्ते, पूल,‘सब वे’ यांची देखरेख हे पालिकेचे दायित्व असून त्यांचे अधिकारी कर्तव्य बजावत नसतील, तर त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे अशा प्रकारांमध्ये काही अधिकारी, ठेकेदार यांच्यावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत खड्ड्यांची समस्या संपुष्टात येणार नाही.

म्हैसाळमधील हत्याकांड म्हणजे ‘मांत्रिक जिहाद’ ! – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील वनमोरे कुटुंबातील ९ जणांची हत्या करण्यात आली. वनमोरे कुटुंबाचे गुप्तधनाच्या आमिषातून केलेले हे हत्याकांड म्हणजे ‘मांत्रिक जिहाद’च आहे.

निधन वार्ता

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणाऱ्या सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ यांचे वडील आणि श्री. रामचंद्र पांगुळ यांचे सासरे महादेव पाटील (वय ८४ वर्षे, रहाणार सांगली) यांचे ६ जुलैच्या रात्री ११.५५ वाजता अल्पशा आजाराने रुग्णालयीन उपचार घेत असतांना निधन झाले.

संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांना आडवे करू ! – संजय शिरसाट, आमदार

‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ नामांतर करतांना कितीही आडवे आले, तरी त्यांना आडवे करू. कार्यवाही झाल्याचे शहरवासियांना एका मासात दिसेल, असे प्रतिपादन आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

गोवंशियांची अवैध वाहतूक करू नये ! – सोलापूर पोलीस

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुणीही गोवंशीय प्राण्यांची अवैध वाहतूक करू नये, तसेच गोवंशीय प्राण्यांचा बळी देऊ नये. अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिसांना संपर्क साधावा.

नागपूर येथे भागीदाराची १२.२७ लाखांची फसवणूक !

भागीदाराच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून बँकेतून ३१ धनादेशांद्वारे ९ लाख ४८ सहस्र रुपये तसेच १६ चलनांद्वारे २ लाख ७९ सहस्र ४२६ रुपये वळते केल्याप्रकरणी देवयानी लांडगे आणि त्यांचे पती नवनीत लांडगे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हिंदूंनो, सावध रहा !

निझामाबाद (तेलंगाणा) येथे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेकडून कराटे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली मुसलमान तरुणांना शस्त्रास्त्रे चालवणे आणि हिंदूंना लक्ष्य करणे, याचे प्रशिक्षण देण्यासाठी ठिकठिकाणी शिबिरे आयोजित केली जात आहेत.

देशाच्या समस्या दूर करण्यासाठी सर्व संप्रदायांनी एकत्र येऊन राष्ट्र बलशाली करणे, ही काळाची आवश्यकता !

दोन संतांमधील भेद हा देशकाल परत्वे असतो, तसेच साम्य असल्याची सूत्रे जशी महत्त्वाची असतात, तेवढी भेदाची सूत्रे महत्त्वपूर्ण नसतात. ‘दासबोध’ वाचतांना त्यात लपलेले संतश्रेष्ठ ज्ञानदेव दिसावेत आणि ‘ज्ञानेश्वरी’ वाचतांना त्यात दडलेले समर्थ रामदासस्वामी समजावेत. देहूच्या मंदिरात समर्थांचे दर्शन घडावे, तर सज्जनगडावरील समर्थ मंदिरात संत तुकाराम महाराजांचे दर्शन घडावे.

हिंदूंना अल्पसंख्यांक करण्याचा प्रयत्न ख्रिस्ती मिशनरी करत आहेत ! – श्रीमती एस्थर धनराज, सहयोगी संचालक, भगवद्गीता फाऊंडेशन फॉर वैदिक स्टडीज, तेलंगाणा

आतापर्यंत ख्रिस्ती मिशनऱ्यांनी स्थापन केलेल्या कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांचे धर्मांतर करणे, हे एकच लक्ष्य राहिले आहे.