मुंबई – राज्यात २० जुलै या दिवशी ३ सहस ३५३ केंद्रांवर इयत्ता पाचवीची, तर २ सहस्र ३५४ केंद्रांवर इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. या दिवशी परीक्षा केंद्र असलेल्या शाळांना सुट्टी देण्याच्या सूचना राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिल्या आहेत. पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी राज्यातून ४ लाख १७ सहस्र ८९४, तर आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी ३ लाख ३ सहस्र ६९७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा परिषदेने सर्व सिद्धता पूर्ण केली आहे.