अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जागा मागणार !

आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा

महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

अयोध्या – अयोध्येत येणे ही आमची तीर्थयात्रा आहे, राजकीय यात्रा नाही. मी येथे राजकारण करायला नव्हे, तर दर्शन घ्यायला आलो आहे. अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी जागा मिळावी; म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार आहेत, असे प्रतिपादन शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. ते सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. १५ जून या दिवशी त्यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते. या वेळी शिवसेना नेते संजय राऊत, युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले…

१. राममंदिराच्या उभारणीच्या काळात अनेक शिवसैनिक महाराष्ट्र, उत्तरप्रदेश किंवा अन्य राज्यांमधून उत्साहाने अयोध्येत आले आहेत. श्रीरामजन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत.

२. मी सर्व माध्यमांना हीच विनंती करतो की, आमच्यात जो उत्साह आणि जल्लोष आहे, त्याचेही थोडे चित्रीकरण करून ते देशाला दाखवावे.

३. न्यायालयाच्या निकालामुळे येथे मंदिर उभारले जात आहे. आम्ही न्यायालयाचेही आभार मानतो.