दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’निमित्त संदेश
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने एकत्रित आलेल्या हिंदु राष्ट्रविरांना माझा नमस्कार ! हिंदु राष्ट्राची स्थापना ही सहजसोपी गोष्ट नाही. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात ‘मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन ठेवू नका, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन ठेवा. असे केल्यानेच आपल्याकडून हिंदु राष्ट्रासाठी भरीव कार्य होईल.
हिंदु राष्ट्राचे कार्य करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, शारीरिक आणि मानसिक बळांपेक्षा आध्यात्मिक बळ श्रेष्ठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः साधना केली, ते युद्धकौशल्य शिकले, मावळ्यांना संघटित करून बलाढ्य शत्रूंशी लढले, त्यांना नमवले आणि ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. आज आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापायचे असेल, तर त्यांच्याप्रमाणेच आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदूसंघटनशक्ती या दोन्हींची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून ‘उपासनेची शक्ती’ वाढवा आणि हिंदूसंघटन करण्यासह हिंदूंच्या संरक्षणासाठी ‘शक्तीची उपासना’ही करा. ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’तून सर्व हिंदु राष्ट्रविरांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पूरक कार्य करण्याची प्रेरणा मिळावी’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था