हिंदूंच्या पवित्र स्थानांना पुनर्वैभव प्राप्त होण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होणे आवश्यक !

१. लक्षावधी हिंदूंनी रक्त सांडूनही स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी अयोध्येतील रामजन्मभूमीचा तिढा सुटणे

शेकडो वर्षे वैभवसंपन्न असलेले अयोध्येतील श्रीराममंदिर १५ व्या शतकात हिंदुद्वेष्ट्या बाबराच्या आज्ञेने भ्रष्ट करण्यात आले आणि त्याचे बाबरी ढाच्यात रूपांतर करण्यात आले. तेव्हापासून त्या स्थानी राममंदिर उभारण्यासाठी हिंदूंनी ७६ वेळा संघर्ष केला. त्या संघर्षात १ लाख ७३ सहस्र हिंदूंनी बलीदान केले. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या मतांध शासनकर्त्यांना या बलीदानाचे सोयिस्कर विस्मरण झाले आहे. त्यांनी रामजन्मभूमीच्या संदर्भात कुठलाही कायदा केला नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने रामजन्मभूमी प्रभु श्रीरामाचीच असल्याचा निर्वाळा दिला. परिणामी स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी अयोध्येतील रामजन्मभूमीचा तिढा सुटला.

२. काशी विश्वेश्वराचे मंदिरही पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत !

काशी (वाराणसी) हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या तीर्थक्षेत्री असलेले ख्रिस्तपूर्व काळातील विश्वेश्वराचे मंदिर क्रूरकर्मा औरंगजेबाने उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी आज असलेली मशीद उभारली. औरंगजेबाने हे मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर अनुमाने १०० हून अधिक वर्षे तेथे मंदिरच नव्हते. या काळात मोगलांपासून रक्षण करण्यासाठी विश्वेश्वराचे लिंग गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले होते. अठराव्या शतकाच्या शेवटी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी लहानसे मंदिर उभारून विश्वेश्वराच्या लिंगाची स्थापना केली. त्यानंतर १९ व्या शतकात पंजाबचा राजा रणजितसिंग याने या मंदिरावर सोन्याचा कळस चढवला. त्यानंतर आजपावेतो काशी विश्वेश्वराच्या मंदिराला पुनर्वैभव प्राप्त होण्यासाठी विशेष प्रयत्न झालेले नाहीत. काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या विध्वंसाची साक्ष देणारी ती मशीद मात्र तेथे हिंदूंच्या धर्मश्रद्धेला खिजवत उभी आहे.

३. मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर इस्लामी वक्रदृष्टी!

येथे मोगलांनी अतिशय भव्य मशीद उभारली आहे. येथून श्रीकृष्ण जन्मभूमीचे ठिकाण साधारणतः १५ ते २० फूटइतकेच दूर आहे.

४. धार (मध्यप्रदेश) येथील सुप्रसिद्ध ‘भोजशाले’वरील इस्लामी अतिक्रमण !

वर्ष १०३४ मध्ये धार (मध्यप्रदेश) येथील सुप्रसिद्ध राजा भोज याने हिंदु जीवनदर्शन आणि संस्कृती यांच्या प्रसारार्थ श्री वाग्देवीचे (श्री सरस्वतीदेवीचे) मंदिर अर्थात् भव्य ‘भोजशाला’ उभारली ! ही भोजशाला शेकडो वर्षे विद्वत्तेचे माहेरघर ठरली ! वर्ष १४०१ मध्ये इस्लामी आक्रमक दिलावर खान घोरी याने भोजशाला काही प्रमाणात उद्ध्वस्त करून त्या भागात मशीद उभारली. तेव्हापासून या मंदिरावर इस्लामी अतिक्रमण टप्प्याटप्प्याने वाढत गेले. आजही हे मंदिर बळकावण्यासाठी धर्मांध मुसलमान कार्यरत आहेत. आज भोजशाला हिंदूंच्या कह्यात राहील कि नाही, अशी स्थिती आहे. सध्या भोजशालेत हिंदूंना वर्षातून एकदाच म्हणजे वसंत पंचमीलाच पूजा करण्याची अनुमती आहे. मुसलमान मात्र तेथे मोठ्या संख्येने प्रत्येक शुक्रवारी नमाजपठण करतात.

या पवित्र स्थानांना पुनर्वैभव प्राप्त होण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होणे आवश्यक आहे !

(संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’)