शिवराज्याभिषेकदिन जपानमध्ये उत्साहात साजरा !

टोकिओ (जपान) – येथील भारतीय दूतावास आणि ‘भारत कल्चरल सोसायटी जपान’ या संस्थेने संयुक्तपणे टोकियोमध्ये प्रथमच शिवराज्याभिषेकदिन साजरा केला. भारतीय दूतावासाच्या ‘विवेकानंद कल्चरल सेंटर’मध्ये पार पडलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात महिला आणि मुले यांसह भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.

दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन झाल्यावर ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे भारताच्या जडणघडणीमध्ये योगदान’ या विषयावर दूतावासाचे उपप्रमुख मयांक जोशी यांनी भाषण केले.