४ भारतीय महिलांना त्रास झाल्याने ‘जातीय समानते’विषयी कार्यक्रमाचे आयोजन ! – तनुजा गुप्ता यांचा हास्यास्पद दावा

हिंदु धर्माचा द्वेष करणाऱ्या एका कथित विचारवंताला मार्गदर्शन करण्यासाठी बोलावणे, हे हास्यास्पद आहे; कारण समानतेवर मार्गदर्शन करणारा कुणाचा द्वेष करत नाही, हे लक्षात घ्या !

प्रभु श्रीरामाच्या प्रजेप्रमाणे आदर्श समाज होण्यासाठी सर्वांनी धर्माचरण करणे आवश्यक ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

ज्याप्रमाणे प्रभु श्रीराम आणि त्यांची प्रजा आदर्श होती, त्याचप्रमाणे आपला समाजही आदर्श व्हावा, यासाठी सर्वांनी धर्माचरण करणे आवश्यक आहे.

काश्मीरप्रश्नी भारताला विरोध करणाऱ्या देशांकडे भारताने लक्ष देऊ नये ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

इस्लामी देशांकडून भारताला होणारा विरोध आणि क्षमा मागण्याची करण्यात येणारी मागणी, हे महत्त्वाचे नाही. भारत अशा लहानसहान प्रतिक्रियांमळे त्रस्त होऊ शकत नाही

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांकडे दुर्लक्ष केल्यानेच शत्रू देश कुरापती काढत आहेत ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘राष्ट्राचा उद्धार’, हेच ध्येय ठेवून आपण समर्पित झाले पाहिजे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा यांचा त्याग करणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे.

अमेरिकेच्या ‘गूगल’मधील हिंदु कर्मचाऱ्यांच्या संघटित विरोधामुळे हिंदुद्वेष्ट्या विचारवंत सुंदरराजन् यांचा कार्यक्रम रहित !

गूगलमधील संबंधित हिंदु कर्मचाऱ्यांचे अभिनंदन ! वास्तविक हिंदु धर्मात जातीवाद नाही. त्यामुळे एका हिंदुद्वेष्टीला बोलावून त्याविषयी मार्गदर्शन करायला सांगणे, हाच हिंदुद्वेष !

‘सूर्यनमस्कार’ निरोगी आयुष्यासाठी कल्पवृक्ष ! – प.पू. स्वामी गोविंददेवगिरि महाराज

सूर्योपासना ही सर्व उपासनांच्या केंद्रस्थानी असून, ऐहिक जीवन जगतांना आत्मसिद्धीपर्यंत पोचण्याचे साधन आहे. व्यायाम, प्राणायाम, आसने आणि उपासना यांचा समावेश असलेला ‘सूर्यनमस्कार’ निरोगी आयुष्यासाठी कल्पवृक्ष आहे !

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा पाठिंबा !

भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. तरी काही हिंदुत्वनिष्ठांकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे.

गोवा येथे होणाऱ्या दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची माहिती देण्यासाठी पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथे पत्रकार परिषदा !

हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे ? आणि ते संवैधानिक मार्गाने कसे निर्माण करायचे ? याविषयी या अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.

‘माझी वसुंधरा अभियानात’ स्वच्छतेत शिर्डीचे साई मंदिर प्रथम क्रमांकावर, तर पंढरपूर दुसऱ्या क्रमांकावर !

देशभरातून लाखो भाविक प्रतिवर्षी शिर्डीत येतात. त्यामुळे शिर्डीतील स्वच्छता हे नगरपंचायतीसमोरील मोठे आव्हान आहे.

अभिनेत्री केतकी चितळे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

पोलीस आणि सत्ता यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. पोलीस यंत्रणेला हाताशी धरून माझ्या विरोधात सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली, अशी याचिका अभिनेत्री केतकी चितळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली.