अभिनेत्री केतकी चितळे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

पोलिसांना हाताशी धरून माझ्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली !

मुंबई – पोलीस आणि सत्ता यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. पोलीस यंत्रणेला हाताशी धरून माझ्या विरोधात सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली, अशी याचिका अभिनेत्री केतकी चितळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी चितळे यांच्या विरोधात ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १५ मेपासून त्या अटकेत आहेत. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधील तक्रारींच्या आधारे माझ्यावर नोंदवलेले गुन्हे अवैध आहेत, तसेच माझी अटकही अवैध आहे. मला अटक करतांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या कायद्याचा भंग करण्यात आला आहे. मला हानीभरपाई देण्यात यावी, अशी मागणी चितळे यांनी केली आहे.