नवी देहली – भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. तरी काही हिंदुत्वनिष्ठांकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे. ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी ‘मी नूपुर शर्मा यांच्यासमवेत आहे’, असे ट्वीट केले आहे.
I stand with nupur https://t.co/AFGm0fLPWr
— Vishnu Shankar Jain (@Vishnu_Jain1) June 6, 2022
दुसरीकडे ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राहुल शिवशंकर यांनी ट्वीट करून म्हटले आहे,
‘‘भारत हा खरेच धर्मनिरपेक्षतावादी देश आहे; कारण नूपुर शर्मा यांना निलंबित केले जाते. काश्मिरी हिंदूंच्या हत्या होतात. समान नागरी कायदा गुंडाळून ठेवण्यात आला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याची कार्यवाही होत नाही. सरकारे मंदिरे चालवतात. अन्याय्य ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ कार्यवाहीत आणला जात आहे, तर भाजप हा इराण आणि कत्तार यांच्या (या इस्लामी देशांच्या) ‘सर्वसमावेशी आणि उदार’ भूमिकेविषयी विचार करतो.’’