नवी देहली – इस्लामी देशांकडून भारताला होणारा विरोध आणि क्षमा मागण्याची करण्यात येणारी मागणी, हे महत्त्वाचे नाही. भारत अशा लहानसहान प्रतिक्रियांमळे त्रस्त होऊ शकत नाही, अशा शब्दांत केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी नूपुर शर्मा यांच्या प्रकरणात येथे पत्रकारांशी बोलतांना मत व्यक्त केले. ‘ज्या देशांनी अनेक वर्षे काश्मीरच्या आणि अन्यही प्रकरणांत भारताच्या विरोधात विधाने केली आहेत, त्यांच्याकडे भारताने लक्ष देऊ नये’, असेही ते म्हणाले.