प्रभु श्रीरामाच्या प्रजेप्रमाणे आदर्श समाज होण्यासाठी सर्वांनी धर्माचरण करणे आवश्यक ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

पू. नीलेश सिंगबाळ

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्याप्रमाणे प्रभु श्रीराम आणि त्यांची प्रजा आदर्श होती, त्याचप्रमाणे आपला समाजही आदर्श व्हावा, यासाठी सर्वांनी धर्माचरण करणे आवश्यक आहे. त्यामुळेच आपले मन शुद्ध आणि सात्त्विक बनते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.

अखिल भारतीय सनातन समितीच्या वतीने श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना पू. सिंगबाळ मार्गदर्शन करत होते. रामकथेला प्रारंभ करण्यापूर्वी पातालपुरीचे पिठाधीश्वर महंत बालकदास महाराज, गंगा महासभेचे स्वामी जितेंद्रानंद आणि पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय सनातन समितीचे अध्यक्ष डॉ. अजय जयस्वाल यांनी सर्व संतांना पुष्पहार आणि उपरणे देऊन सन्मान केला.

या वेळी स्वामी जितेंद्रानंद महाराज म्हणाले, ‘‘बाबा विश्वनाथच्या पवित्र भूमीवर रामकथा होणे, हे आम्हा सर्वांसाठी लाभलेले आशीर्वचन आहे.’’ महंत बालकदास महाराज म्हणाले, ‘‘रामचरितमानस’ची रचना गोस्वामी तुलसीदास यांच्या पूर्वी भगवान महादेवाने केली आहे. ज्यांनी ही रचना केली, आज त्यांच्यात नगरीमध्ये बसून आपण रामकथा श्रवण करत आहोत.’’

क्षणचित्रे

१. श्रीरामकथेच्या निमित्ताने अखिल भारतीय सनातन समितीच्या वतीने सकाळी नाग कुवां मंदिर येथून शोभायात्रा काढण्यात आली.
२. कार्यक्रमाच्या स्थळावरून पू. सिंगबाळ परत निघत असतांना अखिल भारतीय सनातन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि परत पुढील कार्यक्रमांनाही उपस्थित रहाण्याची प्रार्थना केली.

वाराणसी येथील ‘बी.एस्. मार्ट डिपार्टमेंटल स्टोअर’मध्ये सनातनची सात्त्विक उत्पादने उपलब्ध

डावीकडे सनातनचे साधक श्री. संजय सिंह आणि श्री. विजय जायस्वाल

वाराणसी – आशापूर येथील ‘बी.एस्. मार्ट डिपार्टमेंटल स्टोअर’चे मालक आणि सनातनचे हितचिंतक श्री. विजय जायस्वाल यांनी ही सनातनची सात्त्विक उत्पादने त्यांच्या या दुकानामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत.