राज्यात १ लाख ७५ सहस्रांहून अधिक अभियंते नोकरीच्या शोधात !
दळणवळण बंदीमुळे रसातळाला गेलेले उद्योगक्षेत्र पूर्ववत् होत असले, तरी अभियंत्यांसाठी नोकऱ्यांच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दळणवळण बंदीमुळे रसातळाला गेलेले उद्योगक्षेत्र पूर्ववत् होत असले, तरी अभियंत्यांसाठी नोकऱ्यांच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
एवढी थकबाकी होईपर्यंत संबंधित अधिकारी झोपले होते का ? त्यांच्या पगारातूनच वीजदेयकांसाठीची रक्कम वसूल करावी, असे जनतेला वाटल्यास नवल ते काय ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून या दिवशी येथे विराट सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून जोरदार सिद्धता करण्यात आली आहे. या सभेला लक्षावधी लोक येतील, असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
मुंबई-बेंगळुरू महामार्गावर तळेगाव टोलनाका परिसरात उत्पादन शुल्क विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून विदेशी मद्याचा मोठा साठा पकडला. हे मद्य गोवा राज्यात विक्रीसाठी नेले जात होते.
पाण्याची पातळी अल्प झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी उपसा करणाऱ्या ३ पैकी २ पंप उघडे पडले आहेत, यामुळे सांगलीकरांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही.
भाविकांनी कोरोना लसीची दुसरी मात्रा किंवा वर्धक मात्रा घेतली नसेल, तर ती मिळण्याविषयी आवाहन करून लसीकरणाची सुविधा द्यावी, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
कन्नड भवनाचा वापर लिंगायत समाजातील मुलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी केला जाईल. मुलांच्या रहाण्याची, तसेच अभ्यासाची सोय येथे होणार आहे. बहुउद्देशीय सभागृह म्हणून कन्नड भवनचा उपयोग होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल ८ जून या दिवशी घोषित करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पहाता येणार आहे.
वेतन न दिल्याने आत्महत्येचा प्रयत्न करावा लागणे, हे दुर्दैवी आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कामगारांच्या समस्या वेळीच सोडवणे अपेक्षित आहे !
‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत ‘अमृत शहरे’मध्ये सोलापूर महापालिकेस राज्यात चौथा, तर पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे.