अमरावती येथे राणा दांपत्याच्या निवासस्थानासमोर बांगड्या फेकून शिवसेनेचे निषेध आंदोलन !

पत्रकारांशी बोलतांना अपक्ष खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, हिंदुत्वाची बाळासाहेबांची विचारधारा ही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पार पाडत आहेत. त्यामुळे ते लवकरच उद्धव ठाकरे यांची जागा घेतील. ‘मातोश्री’समोर जाऊन हनुमान चालिसा म्हणू.

गुजरातमधील हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना घातले साकडे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गुजरातमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ

बुलढाणा येथे धर्मांधांनी लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत हिंदु तरुणाचा मृत्यू !

धर्मांधांचा वाढता उद्दामपणा ! यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही, हे लक्षात येते !

नगर येथे आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक !

धर्मांधांचा उद्दामपणा ! धर्मांधांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे.

‘दिवाण हाऊसिंग फायनान्स’ची १ सहस्र ५७ कोटी रुपयांची फसवणूक !

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडची (डी.एच्.एफ.एल्.) १ सहस्र ५७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ४ बांधकाम व्यावसायिक आस्थापने आणि त्यांचे संचालक यांसह ९ जणांविरोधात निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

मराठवाडा येथे तरुणांशी विवाह केल्यानंतर पत्नी दागिन्यांसह पळून जाण्याच्या १५ दिवसांत ४ घटना !

तरुणांशी विवाह करून फसवणूक करणाऱ्या टोळीने गेल्या काही वर्षांत अनेक कुटुंबांना गंडा घातला आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, खुलताबाद आणि संभाजीनगर या ठिकाणी ४ घटना घडल्याने ‘लुटेरी दुल्हन’चा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महासांगवी (जिल्हा बीड) येथील मठाधिपती राधाताई महाराज यांना ‘साई सेवा गौरव’ पुरस्कार !

‘श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट साईनगरी’, चंदननगर, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा ‘साई सेवा गौरव’ पुरस्कार श्रीक्षेत्र संत मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी (तालुका पाटोदा, जिल्हा बीड) येथील मठाधिपती महंत राधाताई महाराज सानप यांना प्रदान करण्यात आला.

वारकऱ्यांची गैरसोय टाळा !

चैत्र वारीला एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती असेल, याचा कदाचित् विचारच न झाल्याने ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती’ आणि प्रशासन यांच्या नियोजनाचा अभाव नेहमीप्रमाणे दिसून आला.

अकोला येथील श्रीरामभक्त रजनीकांत कडू यांनी १ कोटी ६८ लाख वेळा लिहून केला ‘श्रीरामा’चा नामजप !

संतांनी प्रवचनात सांगितल्याप्रमाणे नामजप लिहिण्याचा श्री. रजनीकांत कडू यांचा आदर्श इतर भक्तांनी घ्यावा !