नगर येथे आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक !

धर्मांधांचा उद्दामपणा ! धर्मांधांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे. – संपादक 

नगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून आर्.पी.आय.च्या आठवले गटाकडून काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर १४ एप्रिलच्या रात्री ११ वाजता तख्ती दरवाजा आणि तेलीखुंट परिसरात धर्मांधांनी जातीयवादी घोषणा देत दगडफेक केली. या प्रकरणी घटनास्थळावरून २ अल्पवयीन मुलांसह १३ धर्मांधांना कह्यात घेतले आहे, तसेच ५० ते ६० जण पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी उमेश शेरकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (पळून गेलेल्या धर्मांधांनाही पोलीस पकडणार का ? कि त्यांना पळून जाऊ देण्यात पोलिसांचापण हात आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)