बुलढाणा येथे धर्मांधांनी लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत हिंदु तरुणाचा मृत्यू !

  • धर्मांधांनी मारहाण करणे हे त्यांना कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचे लक्षण ! – संपादक 
  • धर्मांधांचा वाढता उद्दामपणा ! यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही, हे लक्षात येते ! – संपादक 
(प्रतिकात्मक छायाचित्र)

चिखली (बुलढाणा) – चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे गावात ५ एप्रिल या दिवशी झालेल्या मारामारीत योगेश सोरमारे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने ते गंभीर घायाळ होऊन त्यांचा मृत्यू झाला. घायाळ तरुणाला प्रथम बुलढाणा आणि नंतर संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे १० एप्रिल या दिवशी बेशुद्ध असतांना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत व्यक्तीचा भाऊ नीलेश सोरमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख नूर शेख शकरजी, नजराना शेख नूर, चांद शकरजी, विठ्ठल खांबाईतकर यांच्याविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

नीलेश सोरमारे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी आमच्या घरासमोर जातीवाचक शिवीगाळ केली. त्यावर आम्ही त्यांना ‘आमच्या घरासमोर शिवीगाळ करू नका’, असे सांगितले. यावरून आरोपींनी लोखंडी रॉड योगेश सोरमारे यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर घायाळ केले.