गुजरातमधील हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना घातले साकडे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गुजरातमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ

चामुंडा मंदिर, कर्णावती येथे प्रार्थना करतांना हिंदुत्वनिष्ठ

कर्णावती (गुजरात) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गुजरातमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला ११ एप्रिल २०२२ या दिवशी प्रारंभ करण्यात आला. कर्णावती, बडोदा, नवसारी, सूरत, उंबरगाव, सिल्वासा येथील मंदिरांच्या ठिकाणी पूजन करून ‘भारतासह संपूर्ण पृथ्वीवर हिंदु राष्ट्र स्थापन होऊ दे’, अशी प्रार्थना करत देवतांना साकडे घालण्यात आले. या उपक्रमामध्ये हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, साधक, कार्यकर्ते आणि भाविक अशा ४६० जणांनी देवतांना साकडे घातले.

उंबरगाव येथे श्रीरामजन्मोत्सवाच्या निमित्ताने काढलेल्या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

उंबरगाव येथे श्रीरामजन्मोत्सवाच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेच्या प्रारंभी श्रीराम मंदिरात हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना करून साकडे घालण्यात आले. या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या ५५० जणांनी सहभाग घेतला.