‘सनातन प्रभात’प्रमाणे हिंदु राष्ट्राचे प्रचारक बनण्याचा निश्‍चय करा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वर्धापनदिनानिमित्त संदेश !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा २३ वा वर्धापनदिन उत्साहपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात साजरा !

वर्धापनदिनाच्या निमित्ताने अनेक वाचक आणि हितचिंतक यांच्या भरभरून शुभेच्छा आणि चैतन्यमय आश्रमभेट !

राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !

‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७४ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे’, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.’

श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात २२७ ठिकाणी ‘गदापूजन’ !

प्रभु श्रीरामचंद्र यांच्या कृपेने रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेला बळ मिळावे आणि हिंदूंमध्ये शौर्यजागरण व्हावे, यासाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात ‘गदापूजन’ करण्यात आले. हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

१६ घंट्यांनंतर मुंबईतील अपघातग्रस्त मार्गावरून रेल्वे वाहतूक पूर्ववत् चालू !

माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ १५ एप्रिलच्या रात्री झालेल्या रेल्वे अपघातामुळे रूळ आणि बाजूचे खांब यांची पुष्कळ प्रमाणात हानी झाली होती. १६ घंटे अविरत दुरुस्तीचे काम केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत् चालू झाली आहे.

गोंदिया येथे अपघाती विम्याच्या अभावी ६० वर्षीय वृद्ध चढले ‘मोबाईल टॉवर’वर !

स्वतःला न्याय मिळावा, यासाठी तालुक्यातील खातिया येथील वासुदेव तावाडे (वय ६० वर्षे) हे १४ एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजता येथील ‘मोबाईल टॉवर’वर चढले.

हनुमान जयंतीच्या दिवशी होणारी इफ्तार पार्टी एक दिवस आधीच उरकली !

मशिदीत हनुमान चालिसाचे आयोजन करून खरा सर्वधर्मसमभाव दाखवण्याची हिंदुत्वनिष्ठांची आयोजकांकडे मागणी

राज ठाकरे यांच्याकडून खालकर चौक (पुणे) येथील हनुमान मंदिरात महाआरती !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून १६ एप्रिल या दिवशी खालकर चौक येथील हनुमान मंदिरात सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या वेळी खालकर चौकात शेकडो पुणेकर जमले होते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अमरावती येथील १२ मंदिरांत साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने रामनवमीपासून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
या अंतर्गत विविध मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घालण्यात आले.