गोंदिया – मुलाचे अपघाती निधन होऊन वर्ष लोटले. एकीकडे न्यायालयीन खटला चालू आहे, तर दुसरीकडे अपघाती विमाही मिळालेला नाही. या त्रासाला कंटाळून स्वतःला न्याय मिळावा, यासाठी तालुक्यातील खातिया येथील वासुदेव तावाडे (वय ६० वर्षे) हे १४ एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजता येथील ‘मोबाईल टॉवर’वर चढले. १५ एप्रिल या दिवशी नायब तहसीलदार पालांदूरकर यांच्यासमवेत झालेल्या वाटाघाटीनंतर सायंकाळी ५.३० वाजता तावाडे हे ‘टॉवर’वरून खाली उतरले.