|

पुणे – राष्ट्रीय मारुति मंदिर (साखळीपीर) येथे रवींद्र माळवदकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून १५ एप्रिल या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन १६ एप्रिल या दिवशी करण्यात येणार असल्याची चर्चा होती. याला विरोध म्हणून बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, हिंदु महासंघ यांसारख्या अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करत पोलिसांना त्या कार्यक्रमाला अनुमती न देण्याविषयीचे आवेदन दिले होते. त्यानंतर इफ्तार पार्टी १६ एप्रिलऐवजी १५ एप्रिलच्या संध्याकाळीच उरकण्यात आली.
NCP organises Iftar party in Pune temple, to allow Muslims to do aarti on Hanuman Jayanti, MNS to organise Hanuman Chalisa recitalhttps://t.co/JmfDpGhMou
— OpIndia.com (@OpIndia_com) April 16, 2022
या संपूर्ण प्रकारामुळे सर्वच हिंदुत्वनिष्ठ संतप्त आहेत. ‘अशा प्रकारे मशिदींमधून हनुमान चालिसाचे आयोजन करून खरा सर्वधर्मसमभाव दाखवावा’, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठांनी केले आहे. हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधामुळे मंदिरात होणार असलेली इफ्तार पार्टी शेवटी मंदिराबाहेर करण्यात आली.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)