रशियाकडून युक्रेनच्या केंद्रीय रेल्वे स्थानकावर आक्रमण

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांच्या कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध करून ‘लढाई अजूनही चालू आहे’, असे म्हटले आहे.

आम्ही नाही, तर ‘नाटो’ आणि युक्रेन यांनी अणूयुद्धाची गोष्ट केली ! – रशियाची कोलांटीउडी

‘जोपर्यंत युद्धाचा आमचा उद्देश पूर्ण होत नाही, तोपर्यंत युद्ध चालूच राहील’, अस सांगतांनाच लावरोेव्ह यांनी ‘युक्रेनशी कोणत्याही अटीविना चर्चा करण्यास रशिया सिद्ध आहे’, असेही म्हटले आहे.

नाशिक येथील मराठी साहित्य संमेलन पंचतारांकित करण्याच्या नादात महामंडळाच्या धोरणाचा बळी दिला !

साहित्य संमेलन पंचतारांकित करण्याच्या नादात महामंडळाच्या धोरणाचा बळी दिला, असा आरोप अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केला आहे.

युक्रेनमधून १७ सहस्र भारतीय बाहेर पडले !

खारकीव सोडा, वाहन मिळाले नाही, तर पायी निघा ! – युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून भारतियांना आदेश

भीषण काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक ! – सौ. शुभा सावंत, हिंदु जनजागृती समिती

महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री महेश्वर देवस्थान, कैलासनगर, अस्नोडा येथे ‘हिंदु संस्कृती आणि महाशिवरात्र’ या विषयावर व्याख्यानात घेण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

युक्रेनविरुद्धच्या युद्धात ४९८ रशियन सैनिकांचा मृत्यू

युद्धामध्ये रशियाचे ६ सहस्र सैनिक मारल्याचा आणि रशियन विमान पाडल्याचा युक्रेनचा दावा फेटाळून लावत रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात ४९८ रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे, तर १ सहस्र ५९७ सैनिक घायाळ झाल्याचे अधिकृतरित्या सांगितले. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष उपस्थिती !

प्रकृतीच्या कारणांमुळे मागील २ मासांपासून शासकीय कार्यक्रमांना मुख्यमंत्री ‘ऑनलाईन’ सहभागी होत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते.

युक्रेनने भारतियांना ओलीस ठेवल्याचा रशियाचा आरोप भारताने फेटाळला !

खारकीवमध्ये युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले आहे. युक्रेनकडून त्यांचा ‘मानवी ढाल’ म्हणून वापर केला जात आहे, असा आरोप रशियाने केला होता.

कॅनडामध्ये ‘स्वस्तिक’वर नाही, तर ‘नाझी हुक्ड क्रॉस’वर बंदी येणार !

कॅनडामध्ये स्वस्तिकवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या खासगी विधेयकामध्ये आता पालट करण्यात येणार आहे. या विधेयकामध्ये ‘स्वस्तिक’ ऐवजी ‘नाझी हुक्ड क्रॉस’ या शब्दाचा वापर करण्यात येणार आहे.

सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारची दडपशाही निंदनीय ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

विवादग्रस्त सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारने  केलेली दडपशाहीची कृत्ये निंदनीय आहेत, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या अभिभाषणात केले.