पुणे – शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणार्या खासगी शिकवणीचालक तरुणाच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार प्रविष्ट केली होती. २५ वर्षीय आरोपी हा खासगी शिकवणी घेतो. पीडित मुलगी त्याच्याकडे शिकवणीसाठी जायची. (छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुलींवर वारंवार अत्याचार होणे, हे कायद्याचा धाक आणि नीतीमत्ता संपल्याचे लक्षण ! – संपादक) आरोपी तिला अश्लील चित्रफीती दाखवणे, ‘अभ्यास करतांना चुकली तर तुला शिक्षा देईन’, असे सांगून तिच्याशी अश्लील कृत्य करायचा. घाबरलेल्या मुलीने याची माहिती आईला दिली.