मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – प्रकृतीच्या कारणांमुळे मागील २ मासांपासून शासकीय कार्यक्रमांना मुख्यमंत्री ‘ऑनलाईन’ सहभागी होत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. विधानभवनात आगमन झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. उपमुख्यमंत्री अजित पवार पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.