युक्रेनविरुद्धच्या युद्धात ४९८ रशियन सैनिकांचा मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

मॉस्को – युद्धामध्ये रशियाचे ६ सहस्र सैनिक मारल्याचा आणि रशियन विमान पाडल्याचा युक्रेनचा दावा फेटाळून लावत रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात ४९८ रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे, तर १ सहस्र ५९७ सैनिक घायाळ झाल्याचे अधिकृतरित्या सांगितले.