|
लक्ष्मणपुरी / भुवनेश्वर – देशभरात कावेबाज ख्रिस्त्यांकडून भोळ्याभाबड्या हिंदूंच्या धर्मांतराचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या ४ घटना समोर आल्या आहेत. यांतर्गत आतापर्यंत अनेकांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून पाद्य्रासह एकूण १० जणांना अटक करण्यात आली आहे. इतर अनेकांची चौकशीही चालू आहे. धर्मांतराच्या या घटना उत्तरप्रदेश आणि ओडिशा या राज्यांत समोर आल्या आहेत. उत्तरप्रदेशात ‘उत्तरप्रदेश बेकायदेशीर धर्मपरिवर्तन कायदा २०२१’च्या अंतर्गत कारवाया करण्यात आल्या.
उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली धर्मांतराचा प्रयत्न : ६ जणांना अटक
जिल्ह्यातील खेसुआ गावात २५ डिसेंबरला प्रार्थनासभेच्या वेळी धर्मांतराच्या तक्रारीवरून पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि त्यांना अटक केली. शारदा नावाच्या एका महिलेने प्रार्थनासभेचे आयोजन केले होते. तिने स्थानिक भूमीवर नियंत्रण मिळवल्याचा आरोपही होत आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी सभा थांबवली आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शारदा, तिची मुले राहुल, अजय, विजय, आशिष आणि मनीष यांच्यासह अन्य २ जण रमेश अन् राजेश यांना अटक केली. (बाटगे ख्रिस्ती धर्मांतर केल्यावरही त्यांची हिंदु नावे तशीच ठेवतात. असे केल्याने त्यांना हिंदु समाजामध्ये वावरण्यास आणि अन्य हिंदूंचे धर्मांतर करणे सोपे जाते ! – संपादक)
सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे ख्रिस्ती धर्मप्रचातर एल्गिन सिंह याला अटक !
जिल्ह्यातील कटसारिया गावात धर्मांतराच्या आरोपाखाली ख्रिस्ती धर्मप्रचारक एल्गिन सिंह याला अटक करण्यात आली. २६ डिसेंबरच्या सकाळी मनवा तिराहा येथून पोलिसांनी त्याला पकडले. हिंदूंच्या धर्मांतराच्या कारवायांत गुंतलेल्या पाद्य्राला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
बालासोर (ओडिशा) येथे धर्मांतराच्या प्रयत्न करणार्या ३ जणांना लोकांनी झाडाला बांधले !
जिल्ह्यातील गोवर्धनपूर गावात धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून स्थानिक ग्रामस्थांनी ३ लोकांना पकडले आणि त्यांना झाडाला बांधले. छनखानपूर गावातील गोविंद सिंह, मित्रपूर मखापाडा गावातील सुबासिनी सिंह आणि रेमुना मुखुरा पंचायतीतील सुकांती सिंह यांनी आदिवासी कुटुंबांना धर्मांतरासाठी आमिष दाखवले होते. ‘देवसेना’ या संघटनेचे स्थानिक अध्यक्ष बादल कुमार पांडा यांनी आरोप केला की, येथे धर्मांतराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंचे धर्मांतर होत असल्याचा आरोप
उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथील नानौता भागातील ओलारी गावात एका घरात धर्मांतराच्या हालचाली चालू असल्याचा आरोप बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांनी केला आहे. घरमालक त्याच्या मुलासह लोकांना धर्मांतराचे आमिष दाखवत असल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोचून दोन्ही पक्षांना शांत केले.
संपादकीय भूमिकाराष्ट्रव्यापी कठोर धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता जाणा ! |