१० सहस्त्र रुपयांची लाच घेतांना तलाठ्यासह एकाला अटक !

पुणे – बाणेर येथील भूमी मिळकतीवर वारस नोंद करण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी तलाठी उमेश देवघडे आणि त्याचा साथीदार काळूराम मारणे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ही कारवाई २७ डिसेंबर या दिवशी बाणेर तलाठी कार्यालयाच्या समोरील आवारामध्ये केली. या प्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती.

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !