चाणक्याविना चंद्रगुप्ताला आणि समर्थांविना शिवाजीला कोण विचारेल ? – राज्यपाल कोश्यारी

महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याविना चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांविना शिवाजीला कोण विचारेल ? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचे मोठे योगदान असते, तसेच आपल्या समाजात गुरूंचे मोठे स्थान असते.

राज्यातील आयुर्वेद रुग्णालये शहरापासून दूर असल्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची वानवा !

महाविद्यालयापासून किंवा शहरापासून आयुर्वेद रुग्णालये दूर असल्याने तिकडे रुग्ण येत नाहीत. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य जिल्ह्यांतील आयुर्वेद रुग्णालयामध्ये रुग्णांची कमतरता भासत आहे.

माहिती अधिकारातील उत्तरावरून कराड नगरपालिकेच्या अधिकार्‍यास मारहाण

नगरपालिकेमध्ये एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. ती नगर रचनाकार अधिकार्‍याने अर्जदारास दिली; मात्र माहिती अशीच का दिली ? या कारणावरून चिडून त्या व्यक्तीने नगर रचनाकार यांना मारहाण केली.

अणूयुद्धाचा धोका !

अणूबाँबच्या किरणोत्सर्गाचा परिणाम जपानमधील लोक आजही भोगत आहेत, तर आताच्या अणूबाँबचा परिणाम पुढील किती शतके मानवजातीला भोगावा लागेल, याची कल्पना करता येत नाही.

राज्यशासनाने मागण्या मान्य केल्याने खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे आमरण उपोषण स्थगित !

मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या अन्य काही मागण्या यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ३ दिवसांपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला प्रारंभ केला होता. राज्यशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतले.

शालेय पोषण आहारातील तांदुळाची खासगी गोदामात साठवणूक !

इतकी वर्षे तांदूळ पडून आहे, हे प्रशासनाच्या कसे लक्षात आले नाही ? तांदळाची प्रत निकृष्ट होण्यासाठी उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक.

पंचगंगेच्या रूकडी (जिल्हा कोल्हापूर) बंधार्‍यावर शेकडो मृत माशांचा खच !

हिंदूंच्या गणेशोत्सव, तसेच अन्य सणांमुळे प्रदूषण होते, अशी आरोळी ठोकणारे कथित पर्यावरणप्रेमी, तसेच अंनिससारख्या संघटना अशा वेळी गप्प बसतात, यातून हे सर्व हिंदुद्वेषी आहेत, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते  काय ?

पिंपरीत (पुणे) प्राध्यापिकेवर बलात्कार करून गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसावर गुन्हा नोंद !

असे पोलीस जनतेचे रक्षण करण्यास लायक आहेत का ? अशा पोलिसांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे, याचा विचार करून अशा पोलिसांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे

पुणे येथे गुंगीचे औषध देऊन अधिवक्त्या महिलेवर एका अधिवक्त्यांचा अत्याचार !

अधिवक्त्या महिलेवर अत्याचार करणारे अधिवक्ता हे वकिली क्षेत्राला कलंकच आहेत. अशा अधिवक्त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. उच्चशिक्षित लोक वासनेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, हे सिद्ध करणारी घटना ! यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

देववाणी संस्कृतची कन्या मायमराठीचा अभिमान राखा ! – प्रा. विठ्ठल जाधव, सनातन संस्था

इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही विद्यार्थ्यांनी मराठीतील बोधकथा, भावगीतांचे सादरीकरण केले आणि गुढीपाडवा, नागपंचमी, नवरात्री, दीपावली, होळी या हिंदु सणांच्या माहितीची प्रात्यक्षिके सादर केली.