पोलीस विभागाला कलंक असणारे वासनांध पोलीस !
असे पोलीस जनतेचे रक्षण करण्यास लायक आहेत का ? अशा पोलिसांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे, याचा विचार करून अशा पोलिसांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे. – संपादक
पिंपरी (जिल्हा पुणे) – येथील हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या आकाश पांढरे या पोलिसाने २८ वर्षीय महिला प्राध्यापिकेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी मागील काही काळापासून पीडित महिलेला लग्नाचे आमीष दाखवून तिचे लैंगिक शोषण करत होता. पीडित महिला गरोदर राहिली असता, आरोपीने पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणला आहे. या प्रकरणी पीडित प्राध्यापिकेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून आरोपीवर बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२० ते २ जानेवारी २०२२ या कालावधीत घडला आहे.