मडिकेरी (कर्नाटक) येथे हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिंनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला !

महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना ठार मारण्याची धमकी

  • हिजाबचा वाद आता हत्येच्या टप्प्यापर्यंत पोचला आहे, यातून यामागे जिहादी षड्यंत्रच आहे, हे स्पष्ट होते. कर्नाटकातील भाजप सरकारने हे षड्यंत्र उद्ध्वस्त केले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
  • न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध महाविद्यालयांत हिजाब घालून येणार्‍यांविरुद्ध सरकार गुन्हे का नोंदवून त्यांना अटक का करत नाही ? – संपादक
प्रातिनिधिक छायाचित्र

मडिकेरी (कर्नाटक) – हिजाब घालून आलेल्या मुसलमान विद्यार्थिनींना प्रवेश नाकारल्यामुळे येथील एका महाविद्यालयाच्या विजय नावाच्या प्राध्यापकाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याविषयी प्राध्यापकाने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. सामाजिक माध्यमांतून ही धमकी देण्यात आल्याने सायबर शाखेच्या पोलिसांकडून याची चौकशी करण्यात येत आहे.

हिजाबच्या मागे आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनेचा हात ! – महसूल मंत्री आर्. अशोक यांचा दावा

महसूल मंत्री आर्. अशोक

हिजाबच्या प्रकरणाविषयी राज्याचे महसूल मंत्री आर्. अशोक म्हणाले की, एक लहान शहर असलेल्या उडुपीमध्ये चालू झालेला हिजाबचा वाद एका आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा पोचतो ? विद्यार्थी असे करू शकत नाही. यामागे आंतरराष्ट्रीय जिहादी आतंकवादी संघटनेची मुख्य भूमिका आहे. एका आतंकवादी संघटनेचे हे काम आहे. ही संघटना इराक, इराण आणि पाकिस्तान या देशांत सक्रीय अहे. या प्रकरणी आतंकवादी संबंध उघड करण्याची आवश्यकता असून ते केले जातील.