केंद्र सरकारने याची चौकशी करून सत्य देशासमोर आणावे ! – संपादक
थिरूवनंतपूरम् (केरळ) – राजभवनावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कुणालाही नाही. मी येथे प्रशासन चालवण्यासाठी नाही. मी केवळ हे पहाण्यासाठी आहे की, सरकार राज्यघटनेनुसार आणि नैतिकततेने कामकाज करत आहे कि नाही, अशा शब्दांत केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी विधानसभेतील त्यांच्या भाषणाच्या वेळी राज्य सरकारला सुनावले. ‘राज्य सरकारचे मंत्री केरळच्या लोकांच्या पैशांचा दुरुपयोग करत आहेत’, असा आरोपही त्यांनी केला. या भाषणाच्या वेळी विरोधी पक्षांकडून गोंधळ घालण्यात आला.
केरल के राज्यपाल आरिफ मोहम्मद खान ने कहा, सरकार में शामिल मंत्री जनता के पैसों की बर्बादी कर रहे हैं https://t.co/utBvh455ux
— AajTak (@aajtak) February 19, 2022
राज्यपाल पुढे म्हणाले की, जेव्हा मी केंद्रीय मंत्री होतो, तेव्हा माझ्याकडे ११ कर्मचारी होते. सध्या केरळच्या मंत्र्यांकडे २० कर्मचारी आहेत. याचा भार राज्याच्या तिजोरीवर पडत आहे. या कर्मचार्यांच्या भरतीच्या नावाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांची भरती केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.