अजित डोवाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणार्या तरुणाला पकडले !
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या येथील घरात एका अज्ञात तरुणाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या तरुणाने डोवाल यांच्या घरात चारचाकी गाडी घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला; मात्र येथील सुरक्षा कर्मचार्यांनी योग्य वेळी या व्यक्तीला थांबवून कह्यात घेतले.