आक्रमणकर्त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून मंत्री बघेल यांच्यावर आक्रमण केले, हे जनतेसमोर यायला हवे !
मैनपुरी (उत्तरप्रदेश) – येथील करहाल मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत असलेले भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री एस्.पी. सिंह बघेल यांच्या ताफ्यावर १५ फेब्रुवारीच्या रात्री आक्रमण करण्यात आले. यात बघेल बचावले. ‘बघेल यांना ठार मारण्याचा आक्रमणकर्त्यांचा कट होता’, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केला आहे.
Union minister S P Singh Baghel sustains minor injuries after attack on convoy https://t.co/Kcti7dW0IX
— The Times Of India (@timesofindia) February 16, 2022
शेतात आधीपासून दबा धरून बसलेल्या किमान १०० आक्रमणकर्त्यांनी बघेल यांच्या वाहन ताफ्यावर अचानक दगडफेक चालू केली. त्यामुळे ताफा थांबवण्यात आला असता आक्रमणकर्ते रस्त्यावर आले आणि त्यांनी ताफ्यातील गाड्यांवर लाठ्याकाठ्यांनी आक्रमण केले अन् नंतर पळून गेले.