रत्नागिरीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस, प्रशासन, शाळा आणि महाविद्यालये येथे निवेदन
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी या नव्या सामाजिक समस्येला आळा घालावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पोलीस, प्रशासन, शाळा आणि महाविद्यालये येथे एका निवेदनाद्वारे केली आहे.