मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे वारंवार केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांची अपकीर्ती करत असल्याची याचिका वानखेडे यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने मलिक यांना फटकारत ‘ही अपकीर्ती थांबायला हवी. अन्यथा तुम्हाला बोलण्यास दिलेली सूट काढून घ्यावी लागेल’, अशी चेतावणी दिली.
‘समीर वानखेडे यांच्याविषयी वारंवार वक्तव्य करून तुम्हाला काय साध्य करायचे आहे ?’, असा प्रश्न न्यायालयाने मलिक यांना विचारला. त्यावर न्यायालयानेच घालून दिलेल्या निर्देशांच्या अधीन राहून हे करत असल्याचे उलट उत्तर नवाब मलिक यांच्या वतीने देण्यात आले. तेव्हा खंडपिठाने ‘ही गोष्ट सिद्ध करा अथवा परिणाम भोगायला सिद्ध रहा’, अशी चेतावणी दिली.
५ फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्रावर हे सिद्ध करण्याचे निर्देश त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.