लस उत्पादन करणारी आस्थापने जगातून कोरोना संपवू इच्छित नाहीत ! – ‘झी न्यूज’ वृत्तवाहिनीचा निष्कर्ष

हा निष्कर्ष योग्य असेल, तर कोरोनाच्या नावाखाली या आस्थापनांकडून जगभरातील लोकांची लूट चालू आहे आणि अनेक देशांना आणि तेथील जनतेला वेठीस धरले जात आहे, असेच म्हणावे लागेल !

(म्हणे) ‘आम्हाला मत दिल्यास २०० रुपयांची दारू ५० रुपयांत देऊ !’

काँग्रेस, तेलंगाणामधील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समिती आदी राजकीय पक्षांचे नाही, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असे आवाहन करतात, हे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित नाही !

खाद्यपदार्थ वृत्तपत्रांत गुंडाळून विक्री करणे आरोग्याला घातक असल्याने त्यावर बंदी घाला !

ही गोष्ट अन्न आणि औषध प्रशासनाला का सांगावी लागते ? आरोग्याला घातक गोष्ट त्यांच्या लक्षात का येत नाही ?

छत्तीसगड येथे नाताळच्या दिवशी २५० ख्रिस्ती कुटुंबातील ६०० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

पत्थलगावातील किलकिला धाममध्ये आर्य समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय कार्यक्रमामध्ये २५० कुटुंबातील ६०० ख्रिस्त्यांनी २५ डिसेंबर या नाताळच्या दिवशी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.

इंग्लंड आणि शारजहा येथून आलेले ५ जण कोरोनाबाधित !

गोव्यात आलेल्या प्रवाशांपैकी ५ जण कोरोनाबाधित आढळले असून त्यांच्या लाळेचे नमुने कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या चाचणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.

मनु, चाणक्य आणि बृहस्पति यांनी विकसित केलेली भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य !

‘मनुस्मृति’ समाजात दुही निर्माण करते’, ‘स्त्रियांना हीन लेखते’ असे सांगत ऋषि मनु यांच्या नावाने बोटे मोडणार्‍या कथित बुद्धीवादी आणि निधर्मीवादी यांना त्यांची महानता समजेल तो सुदिन !

गोव्यात दिवसभरात ११२ कोरोनाबाधित

गोव्यात नाताळ आणि ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने पर्यटक आलेले आहेत आणि ठिकठिकाणी शेकडो मेजवान्यांचे आयोजन केले जात आहे; मात्र सर्वत्र कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे.

३१ डिसेंबरच्या रात्री शिर्डी येथील साई मंदिर बंद राहील !

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरच्या रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत साई समाधी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सूचनेनुसार साई संस्थानने घेतला आहे.

पोलिसांनी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांना घेतले कह्यात !

कांदिवली पश्‍चिम द्रुतगती महामार्गाजवळ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या पुतळ्‍याचे अनावरण करण्‍यास अनुमती नाकारण्‍यात आल्‍याने भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्‍यासह भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी धरणे आंदोलन करून निदर्शने केली.

कोरोनाच्‍या लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणार्‍या दोन धर्मांधांना कुर्ला येथून अटक !

कोणत्‍याही प्रकारच्‍या गुन्‍हेगारीत धर्मांधच पुढे असतात. अशा धर्मांधांना कठोरात कठोर शासन करणेच उचित ठरेल !