कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीत धर्मांधच पुढे असतात. अशा धर्मांधांना कठोरात कठोर शासन करणेच उचित ठरेल ! – संपादक
मुंबई – कोरोनाची लस न घेताच त्याचे बनावट प्रमाणपत्र बनवून त्याची विक्री करणार्या दोन धर्मांधांना पोलिसांनी कुर्ला येथून अटक केली आहे. जुबेर इश्तियाक शेख आणि अल्फैज नजमी हसन खान अशी या आरोपींची नावे आहेत. उत्तर प्रदेशमधील आधुनिक वैद्याच्या साहाय्याने हे बनावट प्रमाणपत्र सिद्ध करत असल्याचे उघड झाले आहे.
जुबेर हा कुर्ला परिसरात कोरोनावरील प्रतिबंधक लसीचा एकही डोस न घेतलेल्यांना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देत आहे. त्यानुसार पोलिसांनी पालिका एल् वॉर्डच्या साहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सापळा रचून त्याला कह्यात घेतले. त्यानंतर त्याचा मित्र अल्फैज शेख याला वडाळा येथून अटक केली. उत्तर प्रदेशच्या प्रतापगड, जिल्ह्यातील एक व्यक्ती आणि स्थानिक आधुनिक वैद्य यांच्या साहाय्याने हे प्रमाणपत्र सिद्ध करत असल्याचे त्यांनी सांगितले. अद्यापपर्यंत तिघांना बनावट प्रमाणपत्र विकल्याचे त्यांनी पोलिसांकडे मान्य केले आहे.