पणजी – गोव्यात कोरोनाबाधित नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. २८ डिसेंबर या दिवशी कोरोनाबाधित ११२ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या ३ मासांत प्रथमच एका दिवसांत १०० हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५३५ झाली आहे.
#GoaDiary_Goa_News_External Goa Records 112 COVID-19 Cases, One Death https://t.co/4ctJmrfbpQ
— Goa News (@omgoa_dot_com) December 28, 2021
२८ डिसेंबरला २ सहस्र ७७६ लोकांची कोरोनाविषयक चाचणी झाली, तर यातील ११२ जण कोरोनाबाधित झाल्याचे आढळले. चाचणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याची टक्केवारी ४.०३ टक्के आहे. गोव्यात नाताळ आणि ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने पर्यटक आलेले आहेत आणि ठिकठिकाणी शेकडो मेजवान्यांचे आयोजन केले जात आहे; मात्र सर्वत्र कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे.