परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘गुरूंचे ऐकायची शिष्याला सवय लागली की, मगच शिष्य देवाचे सांगणे ऐकतो. असे असल्यामुळे अशा शिष्यालाच देव दर्शन देतो; म्हणूनच तो बुद्धीप्रामाण्यवाद्यांना दर्शन देत नाही !’

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रवीण दीक्षित १३७ मताधिक्यांनी विजयी !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी प्रतिस्पर्धी असलेले दैनिक ‘केसरी’चे संपादक दीपक टिळक यांचा पराभव केला.

मी इस्लामला मानत नसून मला ‘भगवद्गीता’ या ग्रंथाद्वारे हिंदु धर्माच्या तर्कशुद्ध पैलूंविषयी जाणून घ्यायचे आहे !

‘‘मला ‘ट्रोल’ करणारे बहुतेक लोक मुसलमान आहेत. ‘मी इस्लामची प्रतिमा खराब करत आहे’, असे त्यांना वाटते. ते माझा द्वेष करतात; मात्र मी कोणताही धर्म पाळत नाही. प्रत्येकाला कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.’’

देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) येथे दत्तजयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ सत्संग पार पडला !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम

‘टीईटी’ अपव्यवहार प्रकरणी अश्विन कुमारांच्या घरी पोलिसांची धाड !

पोलिसांनी २ स्वतंत्र गुन्हे नोंद केले असून आतापर्यंत तत्कालीन आयुक्त सुखदेव ढेरे, सुपे, ‘जी.ए. सॉफ्टवेअर’चे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख, अश्विन कुमार, वर्ष २०२१ ची टीईटी परीक्षा घेणार्‍या आस्थापनाचे प्रमुख सौरभ त्रिपाठी यांना अटक केली आहे.

मंदिरे अर्थकारणाचे नाही, धर्मकारणाचे स्थान ! – आनंद जाखोटिया, समन्वयक, मध्यप्रदेश आणि राजस्थान, हिंदु जनजागृती समिती

केवळ मंदिरांच्या दानपेटीवर डोळा ठेवून मंदिरांचे सरकारीकरण केले जात आहे. मंदिरांमध्ये भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार करून मंदिर संस्कृती उद्ध्वस्त केली जात आहे. मंदिरांच्या धनसंपत्तीचा उपयोग हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी आणि मंदिरांच्या जिर्णाेद्धारासाठी व्हायला हवा…..

खंडणीची मागणी करणार्‍या बनावट एन्.सी.बी.च्या अधिकार्‍यांच्या त्रासाला कंटाळून अभिनेत्रीची आत्महत्या !

आरोपींनी अमली पदार्थ घेतल्याच्या प्रकरणी अटक करण्याची धमकी देऊन तिच्याकडे खंडणी मागितली होती. ही रक्कम जमा न झाल्याने आणि वारंवार खंडणीची मागणी करून मानसिक त्रास दिल्याने अभिनेत्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेत असलेले छायाचित्र ‘एडिट’ करून दिले जाते !

पैसे मिळवण्याच्या उद्देशाने मंदिरांमध्ये कोणतीही अयोग्य कृती करणारा समाज निर्माण होणे, हे धर्मशिक्षण न दिल्याचाच परिणाम !

प्रभु श्रीरामांचे जीवन युगानुयुगे देशाच्या प्रेरणेचा स्रोत ठरत आहे ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

‘शिक्षण प्रसारक मंडळी’ आणि ‘अमृतसंचय प्रतिष्ठान’ यांच्या वतीने धनंजय कुलकर्णी लिखित ‘पत्ररूप भावार्थ गीत रामायण’ या ग्रंथाचे आणि या ग्रंथाच्या ब्रेल लिपीतील रूपांतर असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून माझ्या हत्येचा कट !

‘‘माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या दुसर्‍या बाजूने लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यासंह उभा होता. प्रारंभी माझ्या गाडीवर दगड फेक केली आणि गाडीचा वेग अल्प होताच भरधाव ट्रक माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला !