देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) येथे दत्तजयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ सत्संग पार पडला !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम

देहली – दत्तजयंतीच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) येथे एका ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन केले होते. या वेळी दत्तजयंतीचे महत्त्व, ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप का करावा ? इत्यादी माहितीविषयी सनातन संस्थेचे श्री. हरिकृष्ण शर्मा यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. या वेळी श्री. शर्मा यांनी जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करतांना ‘घरामध्ये पूर्वजांचे छायाचित्र घरी का लावू नये ? पूर्वजांना गती मिळणे म्हणजे काय ?’ इत्यादी प्रश्नांची उत्तरे दिली. या सत्संगाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. सत्संगाचे सूत्रसंचालन कु. सिमरन सचदेवा यांनी केले.