प्रभु श्रीरामांचे जीवन युगानुयुगे देशाच्या प्रेरणेचा स्रोत ठरत आहे ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

मा.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पत्ररूप भावार्थ गीत-रामायण या पुस्तकाचे प्रकाशन, पुणे

पुणे – केवळ पौराणिक नाही, तर वास्तव जीवनातही रामायण नित्यनूतन आहे. प्रत्येकाच्या अंत:करणामध्ये वसलेले प्रभु रामचंद्र हिंदु धर्मापुरते मर्यादित नाहीत. श्रीरामांचे जीवन युगानुयुगे देशाच्या प्रेरणेचा स्रोत ठरत आहे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

(सौजन्य : नमोन्युजनेशन)

‘शिक्षण प्रसारक मंडळी’ आणि ‘अमृतसंचय प्रतिष्ठान’ यांच्या वतीने धनंजय कुलकर्णी लिखित ‘पत्ररूप भावार्थ गीत रामायण’ या ग्रंथाचे आणि या ग्रंथाच्या ब्रेल लिपीतील रूपांतर असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. शिक्षणक्षेत्रात घडत असलेल्या अनिष्ट गोष्टींना चाप बसेल, असे नैतिकतेचे धडे गीत रामायणात आहेत, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.