शिर्डी नगरपंचायतीने दिली कारवाईची चेतावणी
पैसे मिळवण्याच्या उद्देशाने मंदिरांमध्ये कोणतीही अयोग्य कृती करणारा समाज निर्माण होणे, हे धर्मशिक्षण न दिल्याचाच परिणाम !
शिर्डी – येथील साईबाबा समाधी मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव छायाचित्रण करण्यास मनाई आहे. त्यामुळे मंदिर परिसरात कोणतेही छायाचित्र काढता येत नाही. याचा अपलाभ घेत काही छायाचित्रकार ‘फोटो एडिटिंग’च्या (संगणकाच्या साहाय्याने मूळ छायाचित्रात पालट करणे) साहाय्याने भाविकांना समाधीजवळ, मंदिर परिसरात जसे हवे तसे छायाचित्र सिद्ध करून देत आहेत. त्याबदल्यात मोठी रक्कम स्वीकारली जाते. या माध्यमातून भाविकांची लूटही केली जात आहे; मात्र ही गोष्ट साईबाबा समाधी मंदिराच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने चुकीची असल्याचे सांगत शिर्डी नगरपंचायत, साईबाबा संस्थान आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे कारवाई करावी, अशी मागणी ‘बायजा माँ प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव कोलते यांनी केली आहे. अशा प्रकारांवर बंदी घालण्यात आली असून ज्या ‘फोटो स्टुडिओ’मध्ये असे प्रकार आढळून येतील, ते बंद केले जातील, तसेच अशी छायाचित्रे सिद्ध करून घेणार्यांवरही कारवाई करण्याची चेतावणी शिर्डी नगरपंचायतीने दिली आहे.
शिर्डीत मिळतात दर्शन घेतानाचे एडिटेड फोटो; नगरपंचायतीने घेतली गंभीर दखल https://t.co/icZ1oP7NUp
— Aapla Maharashtra Media (@AaplaMedia) December 24, 2021
या पूर्वी पोलिसांकडून या व्यवसायावर कारवाई केल्याने हा व्यवसाय थांबला होता. आता पुन्हा व्यवसाय चालू झाला आहे.